बोरीपार्धी येथे पुन्हा कोरोना रुग्ण आढळले, कोरोना संख्या वाढून झाली इतकी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील बोरीपार्धी या गावामध्ये पुन्हा दोन कोरोना रुग्ण आढळले असून त्यामुळे आता बोरीपार्धी मधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ‛पाच’वर पोहोचली आहे. याबाबत दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी माहिती दिली असून यामुळे कोरोना बाबत नागरिकांनी अधिक जागरूक होण्याची वेळ आली आहे.

बोरीपार्धी या गावामध्ये एक कोरोना रुग्ण आढळला होता त्यानंतर त्याच्या परिवारातील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर पुण्यात कामाला असणाऱ्या बोरीपार्धी येथील दुसऱ्या एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती त्यामध्ये त्यांच्या संपर्कामध्ये असणाऱ्या नातेवाईकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता बोरीपार्धी मध्ये कोरोना बाधितांचा एकूण आकडा पाच झाला आहे.