अखेर इंदुरीकर महाराजांचे ‘ते’ प्रकरण पोहचले कोर्टात



संगमनेर : सहकारनामा ऑनलाईन

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज उर्फ निवृत्ती महाराज देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण शमले असे वाटत असतानाच आता त्यांच्यावर कोर्टात फिर्याद देण्यात आली असल्याचे समोर येत आहे.

इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनामध्ये  गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर असून याबाबत त्यांच्याविरुद्ध संगमनेर येथील कोर्टासमोर आज हे प्रकरण सुनावणीसाठी येणार आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. इंदुरीकर महाराजांनी तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा खुलासा केला होता मात्र कायदा जिल्हा समितीने तो खुलासा फेटाळत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. याच अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध संगमनेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण..

‘सम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगा होतो व विषम तिथीला मुलगी, असे वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे त्यामुळे इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. याबाबत पीसीपीएनडीटी च्या सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि तेथे झालेल्या बैठकीत इंदूकरिकरांना संगमनेर ग्रामीण रुग्णालयामार्फत नोटीस देण्यात आली.