आनंदाची बातमी… केडगाव मधील ‛निडर’ डॉक्टर झाले अखेर ‛कोरोना मुक्त’, हॉस्पिटलमधून मधून मिळाला डिस्चार्ज



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव येथे दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने मोठी खळबळ माजली होती मात्र यातील एका जेष्ठ ‛निडर’ डॉक्टरने अवघ्या 5-6 दिवसांतच कोरोनाला हरवून ते आज आपल्या घरी दाखल झाले आहेत.

केडगाव परिसरातील दोन डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाल्याने गेल्या काही दिवसांमध्ये केडगावमध्ये कोरोनाची मोठ्या प्रमाणावर भीती पसरली होती. मात्र आपल्या बेधडक आणि निडर पणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या या डॉक्टरांनी कोरोनाला हरवून एक प्रकारे केडगावकरांच्या मनात असलेली भीती दूर केली आहे. मात्र नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी व कोरोनाच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वतःला आवर घालावा असे आवाहनही या डॉक्टरांनी केले आहे.

या डॉक्टरांना कोरोना झाल्याची शंका आल्यानंतर त्यांनी स्वतः गाडी चालवत घेऊन जाऊन पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी ‛सहकारनामा’ ला फोनवरून मुलाखत देत ‛कोरोना गया तेल लेने, मै उसको हराकर जल्द ही घर वापस आजाउंगा’ असा विश्वास व्यक्त केला होता तो शब्द आज त्यांनी आपल्या रोग प्रतिकारक शक्तीने पूर्ण केल्याचे दिसत आहे. आज सायंकाळी हे डॉक्टर केडगाव येथील आपल्या निवासस्थानी आले असून ते क्वारंटाईन पिरियड पूर्ण करून पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.