30 जूनला लॉकडाउन उठणार नाही! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन


देशात कोरोनाने आपले जाळे वाढवले आहे. त्यामुळे राज्यातही त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला असुन. 

यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपले विचार मांडले आहेत. त्यांनी कोरोना आणि लॉकडाऊन बाबत बोलताना राज्यात लॉकडाऊनदरम्यान, शिथिलता दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. परंतु तरीही लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणणार आणि एक-एक गोष्ट सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

त्यामुळे राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात सुरू असलेल्या लॉकडाउन बाबत बोलताना त्यांनी  अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहेत  पण तरीही अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आणि अडचणीत सापडलेल्यांच्या बाबत बोलताना त्यांनी आपण शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभे राहणार असल्याचे आश्वासनहि उद्धव ठाकरे यांनी दिलं.