दौंड शहरातील केशकर्तनालयाचे उघडले शटर, अटी व शर्तींचे पालन करून व्यवसाय झाले सुरू



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जवळपास तीन महिने बंद असलेली शहरातील केश कर्तनालय आज दि.28 जून पासून उघडली असल्याने सलून व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले. नाभिक संघटनांनी यासाठी आंदोलने केली होती व आपली आर्थिक अडचण शासनासमोर मांडली होती त्यामुळे राज्य सरकारने अखेर सलून व्यवसाय करणाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या दुकानदारांना काही नियम पाळण्याची सक्ती सुद्धा केली आहे. शहरातील सलून दुकानदारांनी आपली दुकाने उघडीत आज दुकानांची स्वच्छता करून घेतली आहे, तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करूनच व्यवसाय केला जाईल असा विश्वास सुद्धा सलून दुकानदार देत आहेत. तीन महिन्यात नंतर सलून उघडल्याने शहरातील युवा वर्गाने आपापल्या हेअर ड्रेसर्स कडे जात आपल्या आवडीप्रमाणे स्टायलिश हेअर स्टाईल करून घेतली. करोना प्रादुर्भाव अध्याप कमी  झालेला नाही त्यामुळे ग्राहकांनी दुकानात होणारी गर्दी टाळावी व सलून दुकानदारांनी प्रशासनाने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करूनच व्यवसाय करावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे.