देऊळगाव राजे : सहकारनामा ऑनलाईन (प्रशांत वाबळे)
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातही आता कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. मलठण (ता. दौंड ) येथील एका रुग्णाची कोरोना चाचणी खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आली असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
मुंबई शहरातील भिवंडी येथील एक वाहतूक व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारा युवक मागील पाच सहा दिवसांपूर्वी आपल्या आई वडिलांकडे होता. तो येथे असताना आजारी पडल्याने त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले. तेथे त्याला कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्यामुळे वैदयकीय अधिकाऱ्यांनी त्याला दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी सुचविले होते. त्यानंतर तो युवक लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात ऍडमिट झाला. तेथे त्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रुग्णाच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सोशल डिस्टनसिंग, मास्क, व वेळोवेळी हात स्वछ ठेऊन, कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे अवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी केले आहे.