|सहकारनामा|
दौंड : शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय, (दौंड, जि. पुणे) येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या माधुरी प्रमोद काकडे यांना शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी यावर्षीचा स्मार्ट टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे. शैक्षिक आगाज ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी वापर असे विविध उपक्रम राबवणाऱ्या ऑनलाइन टिचिंग करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक चर्चेत सहभाग घेणाऱ्या, तसेच टाकाऊतून टिकाऊ अशा विविध उपक्रमांत कार्य करणाऱ्या देशातील विविध शिक्षकांना स्मार्ट टिचर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यातून एक किंवा दोन शिक्षकांची निवड होते. मुख्य प्रवर्तक अमित चौधरी, हेमन उपाध्याय, मा.
डेप्युटी डायरेक्टर (अजमेर राजस्थान) , सुभाष राबरा, डायरेक्टर ऑफ एनव्हीएएस, संस्थापक अध्यक्षा श्रीमती स्मृती चौधरी, उत्तर प्रदेश राज्य समन्वयक नाना पाटील यांनी पुरस्कारासाठी माधुरी काकडे यांना सन्मानित केले. त्यांचे कविता, कथा, निबंध, हायकू, लावणी, गझल, नाट्यलेखन अशा सर्व साहित्य क्षेत्रात सातत्याने लेखन सुरू आहे.
याबरोबरच त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अध्यापन, विज्ञान प्रकल्प, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती अशा शैक्षणिक जबाबदाच्याही पार पाडत आहेत. पर्यावरण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण या विषयावरील काव्यसंमेलनाचे दोन वेळा आयोजन, विविध पर्यावरणीय उपक्रम व कोरोना सर्वेक्षणसारख्या सामाजिक कार्यातही सहभागी असणाऱ्या माधुरी काकडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया, प्रशालेचे प्राचार्य प्रदीप मस्के, उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर, उपमुख्याध्यापिका समीना काझी, पर्यवेक्षक मोहन खळदकर ,सर्व सेवकवृंद आणि समाजातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.