थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)
पूर्व हवेली कोरोनाच्या विळख्यात अधीक घट्ट अडकताना दिसत आहे. लोणी काळभोर, उरुळीकांचन, कुंजीरवाडी, मांजरी बुद्रुक, खानापुर, कदमवाकवस्ती, शेवाळेवाडी या प्रमुख ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आरोग्य विभाग, महसूल प्रशासन ग्रामपंचायतीच्या सहकार्याने रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत परंतु संसर्गाची साखळी तुटताना दिसत नाही.
हवेली तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.2 जुलै पर्यंत हवेलीत बारा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकुण 448 कोरोना संक्रमीत रुग्ण असून त्यापैकी 215 रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले आहेत तर आणखी 226 रुग्ण वेगवेगळ्या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आजपर्यंत सात जण यामध्ये दगावले आहेत. हवेलीतील लोणी काळभोर प्राथमीक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या परिसरात सर्वात जास्त रुग्ण आढळून आले असून ही संख्या 114 आहे परंतु यापैकी 61 जणांनी कोरोनावर मात केली आणि 52 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यानंतर खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रात 56 रुग्ण आढळले त्यातील 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत व 19 जण उपचार घेत आहेत. त्या खालोखाल खानापूर व फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 36 रुग्ण आढळले. फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 20 रुग्ण बरे झाले तर 16 उपचार घेत आहेत तसेच खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्ग 10 रुग्ण बरे झाले तर 26 जण उपचार घेत आहेत. यातील पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, सोरतापवाडी गावामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या 164 आहे त्यातील 76 जण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
—————————————————-
‛सहकारनामा’ च्या ब्रेकिंग बातम्या पाहण्यासाठी आमच्या 9096777750 या नंबरला आपल्या ‛व्हाट्सअप’ ग्रुपमध्ये सामील करा