लखनऊ (यूपी) :
मोस्ट वॉन्टेड गुंडांला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस उप अधीक्षकांच्या पथकावर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने यामध्ये पोलीस उप अधिक्षकांसह आठ पोलीस कर्मचारी शहिद झाले आहेत तर अन्य सात पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना कानपुरच्या शिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरू गावात घडली आहे. पोलीस पथक कुख्यात गुंड विकास दुबे याला पकडण्यासाठी तेथे गेले होते त्यावेळी हि घटना घडली. या गोळीबारात शहिद झालेल्यांमध्ये देवेंद्र कुमार मिश्र, (सीओ)) बिल्हौर) महेश यादव, (एसओ शिवराजपुर) अनूप कुमार, (पोलीस ठाणे इन्चार्ज मंधना) नेबूलाल, (सब इन्स्पेक्टर, शिवराजपुर) सुल्तान सिंह (कॉन्स्टेबल, चौबेपुर) राहुल, (कॉन्स्टेबल, बिठूर) जितेंद्र, (कॉन्स्टेबल, बिठूर) बबलू (कॉन्स्टेबल, बिठूर)
यांचा समावेश आहे. या घटनेनंतर यूपी पोलिसांमध्ये कमालीचा रोष असून याबाबत सीएम योगी आदित्यनाथ यांनी डीजीपी आणि अपर मुख्य सचिव गृह यांच्याशी चर्चा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ज्यावेळी कुख्यात गुंड विकास दुबईला पकडण्यासाठी या गावात दाखल होत होते त्यावेळी गावाच्या बाहेर जेसीबी मशीन रस्त्यावर आडवे लावण्यात आले होते त्यावेळी पोलीस आपल्या वाहनांच्या ताफ्यासह तेथे थांबले असताना पाळत ठेऊन असलेल्या गुंडांनी अंदाधुंद फायरिंग सुरू केली. पोलिसांनीही यास प्रत्युत्तर दिले मात्र गुंड टोळी उंच ठिकाणी असल्याने खाली असलेल्या पोलिसांना गोळ्या लागून यात 8 पोलीस शहीद झाले.
यावेळी डीजीपी एचसी अवस्थी यांनी बोलताना आम्ही सर्व जखमी पोलीस कर्मचार्यांना बरे करण्यासाठी त्यांवर लक्ष ठेऊन आहोत आणि विकास दुबेविरूद्ध ऑपरेशन जारीच ठेवले जाणार असून त्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात लवकरच यश येईल असे सांगितले.