दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील मिनी शहर असलेले केडगाव आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले आहे. केडगाव स्टेशन, 22 फाटा, हंडाळवाडी आणि त्यानंतर आज पुन्हा सोडनवर वस्ती येथे एक नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे दोन दिवसात येथे विविध ठिकाणी 4 कोरोना रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सहकारनामा’ला दिली आहे.
केडगावमध्ये आता दररोज कुठे ना कुठे कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने नागरिकांनी स्वतः होऊन याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. केडगावमध्ये मागील दहा दिवसांपूर्वी एक खाजगी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते त्यानंतर तब्बल दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते या सर्वांवर उपचार केल्यानंतर त्यातील अनेकजण निगेटिव्ह होऊन घरीही परतले होते मात्र हे सर्वजण कोरोना हिस्टरीने बाधित झाल्याचे समोर आले होते मात्र आता जे केडगाव स्टेशन, 22 फाटा, हंडाळवाडी आणि आज सोडनवर वस्ती येथे सापडलेला रुग्ण असे मिळून जे नवीन चार रुग्ण सापडले आहेत त्यांची हिस्ट्री सध्यातरी समोर येत नसल्याने केडगावकरांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन शक्यतो घराबाहेर पडू नये, मास्क परिधान करावे, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी केले आहे.