उद्या दौंडचे भाग्यविधाते स्व.सुभाषअण्णा कुल यांची पुण्यतिथी, मात्र या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्याचे आ.राहुल कुल यांचे आवाहन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

उद्या ४ जुलै रोजी दौंड तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते, कर्मयोगी, माजी आमदार स्व.सुभाष आण्णा कुल यांची तिथी आहे. दरवर्षी पुण्यस्मरण करताना सुभाष अण्णांच्या पुण्यतिथी निमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांद्वारे त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा दिला जातो. मात्र यावर्षी तालुक्याचे आमदार आणि सुभाष अण्णांचा वारसा पुढे चालवणारे त्यांचे आरोग्यदूत सुपुत्र राहुल कुल यांनी अण्णांवर प्रेम करणाऱ्या जनतेस आवाहन करत यावर्षी कोरोना या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी कै. सुभाष आण्णांवर प्रेम करणाऱ्या तमाम सहकारी बांधवानी उद्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे, उपक्रमाचे आयोजन करू नये तसेच राहू येथील निवासस्थानी गर्दी न करता आपल्या घरूनच अण्णांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती केली आहे. 

पुढे त्यांनी याबाबत माहिती देताना दौंड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता, सामाजिक भान ठेऊन अत्यंत जड अंतःकरनाणे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले आहे. आपल्या सर्वांच्या साथीने आपण लवकरच या संकटातून सुखरूप बाहेर पडू हीच कै. सुभाष आण्णांना खरी श्रद्धांजली असेल असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे.