दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरातील करोना संसर्गाची साखळी आणखीनच वाढत चालली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शहरातील 32 नागरिकांचे प्रयोग शाळेतील अहवाल आज दि.3 रोजी उशिरा प्राप्त झाले आहेत. त्यापैकी चार व्यक्ती करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे शहरात आणखीनच भीतीचे वातावरण तयार झाले आहे आणि म्हणूनच या सर्व परिस्थीतीमुळे येथील व्यापारी संघटनांनी शहरातील व्यापारपेठ सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दि.5 ते 7 तीन दिवस शहरातील सर्व व्यापारपेठ बंद राहणार आहे. या तीन दिवसांमध्ये फक्त औषधांची दुकाने व दिलेल्या ठराविक वेळेत दूध विक्री होणार आहे.
आज दि.3 रोजी 92 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल दि.4 रोजी प्राप्त होणार आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण कायम आहे. नगरपालिकेच्या वतीने ठीक ठीकाणी औषधांची फवारणी करणे सुरु आहे. नागरिकांनी सुद्धा विनाकारण घराबाहेर पडू नये, व लॉक डाऊन च्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.