पुणे : सहकारनामा ऑनलाईन
राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा करोनाच्या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लक्षणे जाणवली होती त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दुसऱ्यांसाठी अहो रात्र झटणारा एक सामाजिक कार्यकर्ता मात्र कोरोनाशी सुरू आलेल्या लढाईत धारातीर्थी पडल्याचे भावना त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.
दत्ता साने हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. दत्ता साने यांचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब आणि कार्यकर्ते मोठ्या दुःखात आहेत.