दौंड शहरातील व्यापारपेठ ‛बंद’चा निर्णय अखेर ‛मागे’, ‛या’ कारणामुळे बंदचा निर्णय घेण्यात आला मागे – राजेश पाटील यांची माहिती



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी) 

शहरातील विविध भागातून करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत, व  बाधितांची संख्या सुद्धा रोज वाढतच असल्याने महामारी च्या संसर्गाची साखळी तुटावी या  उद्देशाने दौंड व्यापारी महासंघ संघ व दौंड मर्चंट असोसिएशन च्या सर्व  सदस्यांनी एक मताने सलग तीन दिवस(5ते7 जुलै) शहरातील संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु अचानक पणे या  दोन्ही संघाने आपला बंद चा निर्णय रद्द केला आहे. शहरासाठी फायदेशीर ठरणारा हा निर्णय का मागे घेण्यात आला हे जाणून घेण्यासाठी राजेश पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, शहराचे हित लक्षात घेऊन सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने बाजारपेठ बंद चा निर्णय घेतलेला होता. व घेतलेला निर्णय आम्ही एका जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्याला कळविला. परंतु त्यांनी थोडेसे असहकार्य दर्शवित व्यापारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठांचा आहे तो निर्णय त्यांनाच घेऊ द्या. तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेणे योग्य नाही असे सांगितले. त्यामुळे प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही असे दिसत असल्याने व्यापाऱ्यांनी नाईलाजास्तव बंद चा निर्णय मागे घेतला आहे असे राजेश पाटील यांनी सांगितले.

शहरातील बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने दौंड करांच्या आरोग्याचा विचार करता शहरात पुन्हा लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मागणी खुद्द नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी केली आहे मात्र प्रशासनाकडून अध्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहून आज  ना उद्या प्रशासनाला लॉक डाऊन चा निर्णय घ्यावाच लागणार असे चित्र सध्या दौंड मध्ये पहावयास मिळत आहे.