दौंड : सहकारनामा ऑनलाईन
शिरूर तालुक्यातील निमोने येथील दहा लाखांची लूट करणारे गुंड अक्षय काळे याच्या टोळीतील आठ दरोडेखोर यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत चपळाईने व शिताफीने पकडले होते.
शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील अटक आरोपींचा साथीदार शिवा उर्फ किशोर छबु साळुंके (राहणार – बोरीपार्धी, तालुका दौंड जिल्हा पुणे) हा त्याचे इतर साथीदारांना अटक केल्यापासून फरारी होता. सदर आरोपी पोलिसांना गुंगारा देत असले कारणाने त्याला पकडण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके नेमण्यात आली होती. शिवा उर्फ किशोर साळुंके हा केडगाव रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा LCB आणि यवत पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी केडगाव परिसरामध्ये सापळा रचला होता. सदर आरोपी हा केडगाव रेल्वे स्टेशन परिसरात येताच तेथे त्याला पकडण्यात येऊन त्यास पुढील तपासकामी वैद्यकीय तपासणी करून शिरूर पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दत्तात्रय गुंड, सहा.फोै.दत्तात्रय गिरीमकर, पो हवा. उमाकांत, पो.हवा. जितेंद्र पानसरे, पो.ना.राजू मोमीन, पो.ना जनार्दन शेळके, पोना विजय कांचन, पो शि. धिरज जाधव यांनी केली आहे.