गरीब मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी नागरिकांनी आपले जुने मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, कम्प्युटर दान करण्याचे पुणे जिल्हापरिषदेकडून आवाहन



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. परंतु ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. परंतु  ग्रामिण भागातील अनेक विद्यार्थ्यांना अँड्राईड फोन,स्मार्ट टिव्ही,टॅब, लॅपटॉप, कंम्प्युटर अशा साधनांच्या अभावी शिक्षण घेणे अवघड झाले आहे. हे लक्षात घेऊन ‪पुणे जिल्हा परिषदेने समाजातील दानशूर व्यक्तींना आपले सुस्थितीतील जुने मोबाईल, टॅब, लॅपटॉप, कंम्प्युटर, स्मार्ट टिव्ही अशा वस्तू या विद्यार्थ्यांना दान करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय शक्य असल्यास या सर्व वस्तू नव्याही घेऊन देता येतील. याबाबत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत  विनंती करत या मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या कक्षेत आणण्यासाठी मदतीचा हात आवश्यक आहे. तरी कृपया आपल्याकडील सुस्थितीत असणाऱ्या मोबाईल, लॅपटॉप आदी वस्तू पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जमा कराव्या. असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी आपण 

1800 233 4130 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.