थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी )
संत निरंकारी मंडळाचे वतीने तसेच निरंकारी सदगुरू सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन झोन पुणे ब्रँच आव्हाळवाडी तर्फे आपत्कालीन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
संत निरंकारी मंडळ हे एक आध्यात्मिक अधिष्ठान असलेली संस्था आहे आजपर्यंत या मंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. आज आव्हाळवाडी येथील रक्तदान शिबीरात ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले हे सर्व रक्त ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी संकलीत केले. या भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन सरपंच ललिता चद्रकांत आव्हाळे यांनी केले.तर शरद मारुती आव्हाळे व वैशाली उमेश आव्हाळे यांनी भेट देऊन मिशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
आज संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन रक्तदान करणाऱ्यां संस्था मध्ये संपूर्ण जगामध्ये अग्रेसर आहे. आजपर्यंत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे दहा लाखाहून अधिक युनिट रक्त मानव मात्राच्या कल्याणासाठी संकलित करण्यात आले आहे. संत निरंकारी मंडळाचे संयोजक दत्तात्रय सातव यांनी आलेल्या सर्व रक्तदात्यांचे तसेच मान्यवरांचे आभार व्यक्त केले.