संपूर्ण दौंड शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनीही केली होती मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड नगर पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दौंड शहरात पुन्हा लॉक डाऊन लागू करावयाची केलेली मागणी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी मान्य केली आहे. याबाबत ‛सहकारनामा’ने त्यांची हि मागणी आपल्या वृत्तातून लावून धरली होती त्या अनुषंगाने उद्या (दि.6) पासून संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती मंगेश शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील संपूर्ण व्यापार पेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने उघडली जाणार आहेत.

शहरातील सर्वच भागातून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत होती त्यामुळे दौंड करांच्या चांगल्या आरोग्यासाठी शहरात  पुन्हा लॉक डाऊन लागू करावा अशी मागणी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. शहरातील वाढती रुग्णांची संख्या पाहून प्रांताधिकारी यांनी आजपासून दौंड शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर केले आहे मात्र याची अंमलबजावणी उद्यापासून कडकपणे राबविली जाणार आहे. याआधीच येथील व्यापाऱ्यांनी शहरातील व्यापारपेठ बंद ठेवण्याची तयारी दर्शविली होती त्यामुळे आता त्यांचेही ही प्रशासनाला सहकार्य मिळणार आहे. शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने पोलीस प्रशासनाने सुद्धा कडक पाऊल उचलून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या  नागरिकांवर वर बेधडक कारवाई करावी तरच संसर्गाची साखळी तुटली जाईल.