..तर ‛विकास दुबे’ हा नेपाळचा ‛दाऊद’ ठरू नये, आठ पोलिसांच्या हत्येनंतर शिवसेनेचा योगी सरकारवर नेम



वृत्तसेवा : 

उत्तर प्रदेशमध्ये गुंडशाही ही काही नवीन नाही. येथे कित्येक गुंड टोळ्या आणि त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे हे राज्य कायम चर्चेत राहिले आहे. सध्याच्या सरकारने या राज्यातील गुंडशाही संपवल्याचे दावे केले आहेत मात्र नुकत्याच कानपूरमधील एका गावात पोलिसांवर झालेला बेछूट गोळीबार आणि त्यामध्ये आठ पोलीस शहीद झाल्याने या सरकारच्या गुंडशाहीला लगाम घालण्याच्या दाव्यावर  मोठे प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे.  याबाबत शिवसेनेनं ‛जनता करोना लॉकडाऊनमध्ये बंदिस्त आहे. उद्या गुंडांपासून सुरक्षित राहण्यासाठी लॉक डाऊनमध्ये राहावे लागेल का’ असा प्रश्न तेथील जनतेच्या मनात आहे’ असे म्हटलं आहे.

नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या हत्याकांडाने मागे चाळीस वर्षांपूर्वी झालेल्या पोलिसांच्या हत्याकांडाची आठवण करून देत इतक्या वर्षांनंतरही उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंड अशा पद्धतीने मारत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय? असा हल्ला शिवसेनेनं योगी सरकारवर केला आहे. कानपूरमध्ये पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे हा नेपाळला पळाल्याची माहिती बातम्या मधून येत आहे त्यावरून  शिवसेनेनं योगी सरकारला धारेवर धरत सध्याच्या परिस्थितीमध्ये  नेपाळशी आपले संबंध ठीक नाहीत त्यामुळे त्यामुळे कुख्यात गुंड  विकास दुबे हा आपल्यासाठी नेपाळमधील दाऊद ठरू नये अशी भीतीही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.