: सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०४ वरील खंडाळा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या
खंबाटकी घाटामध्ये प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या टोळीचा खंडाळा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड आणि त्यांच्या पथकाने पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी या चोरट्यांनी तब्बल सहा गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मिळालेल्या माहिती नुसार खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खंबाटकी घाटामध्ये सातारा लेनला दक्षिणेस असलेल्या भैरवनाथ मंदीराकडे खाली जाणारे रस्त्यावर या घटनेतील फिर्यादी व त्यांची मैत्रीण थांबले असता अज्ञात दोन इसमांनी त्यांच्या अन्य दोन साथीदारांसह फिर्यादीच्या मैत्रिणीच्या गळयास चाकू लावून दुसऱ्या चोरटयाने फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करत त्यांचेकडील दोन मोबाईल फोन, सोन्याची
अंगठी, रोख रक्कम व फिर्यादी यांची काळया रंगाची नवीन पल्सर मोटारसायकल चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरून नेली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलीस ठाणे येथे १ लाख ६५ हजार ४०० रुपयांच्या
जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. दाखल गुन्हयाचा तपास खंडाळा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हनुमंत
गायकवाड हे स्वतः करीत असताना जबरी चोरीच्या गुन्हयाचा तपास करून गुन्हा उघडकीस आणून गेलेली मालमत्ता हस्तगत करण्याच्या सुचना श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक, सातारा व धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी तपास अधिकारी हनुमंत गायकवाड यांना दिल्या होत्या. तपास अधिकारी सपोनि हनुमंत गायकवाड यांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पो.ना.सचिन वीर, प्रशांत
धुमाळ, सुरेश मोरे व बालाजी वडगावे यांनी दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईल फोन संबंधी तसेच घटनास्थळावरील डाटा संकलित करून तांत्रिक बाबीच्या आधारे त्यांचे पृथ्यःकरण करून काही संशयित क्रंमाक
काढून त्याबाबत सखोल तपास सुरू केला. आणि हा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे दादा ऊर्फ संजय बारीकराव
जाधव (रा. रामोशी वस्ती मुळीकवाडी फलटण) यांने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले. दादा जाधव हा त्या नंतर फरार झाला होता. त्याचा शोध खंडाळा पोलीस पथक घेत होते. जाधव याच्यावर यापुर्वी जबरी चोरीचे एकुण ०६ गुन्हे बारामती शहर, लोणंद व दहिवडी या ठिकाणी दाखल आहेत.
दिनांक ०५/०७/२०२० रोजी दादा जाधव हा वेळे येथे खंबाटकी घाटमार्ग जाणार असल्याची खात्रीशीर बातमी सपोनि हनुमंत गायकवाड व त्यांच्या पथकाला मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी सापळा लावला असता दादा जाधव हा
त्याच्या जवळ असणाऱ्या मोटार सायकलवरून जात असताना त्यास जुना टोलनाका खंडाळा येथे ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली
असता त्याने सुरवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्यास विश्वासात घेवून माहिती घेतली असता त्याने व
त्याचे साथीदार आरोपी १) पप्पू सर्जेराव जाधव (वय २४ वर्ष, रा.रामोशी वस्ती, मुळीकवाडी ता.
फलटण. जिल्हा.सातारा) २) तुषार बाळासो पाटोळे (वय २० वर्ष, रा.तरडगाव ता.फलटण जिल्हा
सातारा) ३) अजित महादेव बोडरे (मु.पो.तांबवे ता.फलटण जिल्हा सातारा) यांनी वरील गुन्हा मिळून केलेला असल्याची कबूली दिली. वरील आरोपी पैकी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांचेकडून चोरीस गेले
मोटारसायकल सह दोन मोबाईल फोन असा एकुण १ लाख ५९ हजार रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले. आरोपी अजित महादेव बोडरे हा अद्दयाप फरारी असून त्याचा शोध घेण्यासाठी एक पोलीस तपास पथक रवाना
करण्यात आलेले आहे.
याबाबत या आरोपींनी आणखी गुन्हे केल्याची शक्यता गृहीत धरून वरील तिन्ही आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी खंबाटकी घाटात व धोम बलकवडी कॅनॉल लगत आणखी दोन प्रेमी युगुलांना मारहाण करून जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबूली दिली आहे. तसेच त्यांकडून दोन चोरीच्या मोटारसायकली मिळून आलेल्या असून एक मोटारसायकल लोणंद व दुसरी बारामती
येथून चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. या आरोपींनी हिंगणगाव येथून दोन जर्सी गाई चोरून त्या बारामती येथे विक्री केले असल्याचे व चार शेळया व एक बोकड चोरी करून विक्री केल्याची कबूली दिलेली आहे. या आरोपींकडून एकूण ०६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या गुन्ह्यांचा अधिक तपास खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे करीत आहे.
सदरची कारवाई ही श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सातारा व धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग, यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस ठाणेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.ना.सचिन वीर, प्रशांत धुमाळ, सुरेश मोरे, बालाजी वडगावे, नितीन नलवडे, संजय थोरवे व
शांताराम शेलार यांच्या पथकाने केली आहे.
■ खंडाळा पोलिसांकडून जाहीर आवाहन
खंबाटकी घाटात तसेच घाटालगत असलेल्या झाडीत व धोम बलकवडी कॅनॉलवर ज्या प्रेमी युगुलांना मारहाण करून लुटण्यात आलेले आहे. परंतू त्यांनी समाजाच्यामध्ये बदनामी नको म्हणून अशा लुटमार झालेल्या पिडीत युगुलांनी पोलीस ठाणे येथे तक्रारी नोंदविलेल्या नाहीत. अशा सर्व पिडीतांनी खंडाळा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा. त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील असे आवाहन खंडाळा पोलिसांकडून करण्यात आले आहे.