हवेलीतील वीस गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित : उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी) 

हवेलीतील कोरोनाचा संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर उपाययोजना करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बैठका झाल्या परंतु आजपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी झाली नाही म्हणून आज हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी उरुळी कांचन, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, वाघोली, मांजरी खुर्द  या पूर्व हवेलीतील गावासह वीस गावे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.

हवेलीतील गावामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे उरुळी कांचन येथे गेल्या दोन दिवसात सतरा तर कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, शेवाळेवाडी मांजरी बुद्रुक या गावात दररोज रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ही रुग्णाच्या संक्रमणाची साखळी तोडण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर आली आहे त्यामुळे या गावात कंटेटमेंट झोन जाहिर करण्यात आला आहे. आज दि.8 जुन पासून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाव्यतिरीक्त सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तूची दुकाने यात औषधालय भाजी दुध डेअरी सकाळी दहा ते दोन या दरम्यान चालू राहतील. कोरोनाचा कहर चालू असला तरीही सर्वसामान्य नागरिक याकडे फार गांभिर्याने घेताना दिसत नाहीत तोंडावर मास्क वापरणे अपरिहार्य असताना मास्क शिवाय भटकणाऱ्यांची संख्या मोठी आहे.यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत महसूल विभाग पोलिस प्रशासन यांनी संयुक्तिक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.