दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृह इमारतीवर झालेल्या दगडफेकीचा व हल्ल्याचा आज (दि ८) दौंड मध्ये वंचित बहुजन आघाडी,भारतीय बौद्ध महासभा,बौद्ध धम्म सेवा संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी दौंड पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना निषेधाचे व समाजकंटकांवर कारवाई बाबतचे निवेदन देण्यात आले.दि.7जुलै रोजी काही समाजकंटकांनी राजगृहावर हल्ला करून परिसरातील झाडांच्या कुंड्या तसेच इमारतीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. सदरचा हल्ला म्हणजे बहुजन समाज, बौद्ध समाजाच्या अस्तित्वावर झाला आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत असून सदरच्या घटनेची चौकशी करून संबंधित समाजकंटकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी तसेच राजगृहास 24तास पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अश्विन वाघमारे, उत्तमराव गायकवाड,संजय गायकवाड,श्रीकांत शिंदे,बी.वाय. जगताप,अनिकेत मिसाळ आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.