हवेलीतील ‛हि’ 10 रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी करण्यात आली अधिग्रहीत



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)

कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण पूर्ण जिल्ह्यातील ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुच्या संसर्गांत अधिक वाढ होवू नये व त्यावर तात्काळ उपाय योजना आखणे आवश्यक होते. तसेच संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पुर्व तयारी म्हणून हवेली तालुक्यातील भारत संस्कृती दर्शन ट्रस्ट,आयमॅक्स हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल व केअर हॉस्पिटल(वाघोली), पल्स हॉस्पिटल(नर्हे), महेश स्मृती हॉस्पिटल(शेवाळेवाडी), प्रयागधाम हॉस्पिटल व चिंतामणी हॉस्पिटल (कोरेगावमूळ),श्लोक हॉस्पिटल (शिवापूर), शिवम हॉस्पिटल (कदमवाकवस्ती), नवले

हॉस्पिटल (नर्हे), विश्वराज हॉस्पिटल

(लोणी काळभोर) ही १० रुग्णालये कालपासून अधिग्रहित करण्यात

आली आहेत. यातील 80 टक्के खाटा कोवीड रुग्णांसाठी राखून ठेवल्या आहेत अशी अधिसूचना उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी काढली आहे.

हवेली तालुक्यातील बहुतेक सर्व मोठ्या लोकसंख्येच्या गावात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत सध्या केवळ लोणी काळभोर येथील विश्वराज हाॅस्पिटलमध्ये केवळ वीस खाटा यासाठी उपलब्ध आहेत परंतु गेल्या आठवडाभरात रुग्ण संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे त्यामुळे या रुग्णाची सोय करताना आरोग्य विभागावर ताण येत आहे.