बारामती : सहकारनामा ऑनलाईन
कोरोनामुळे राज्यात सध्या लॉकडाउन सुरू असून अनेकांना घराबाहेर पडतानाही दहा वेळा विचार करावा लागत आहे मात्र अशाही परिस्थितीमध्ये नशेकऱ्यांचे धंदे मात्र काही केल्या बंद होताना दिसत नाहीत. असाच काहीसा प्रकार आज बारामती शहरातील आमराई परिसरामध्ये असणाऱ्या अनंतनगर येथे घडला असून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे छापा मारून सुमारे 1 लाख रुपयांचा सव्वातीन किलो गांजा हस्तगत केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना बारामती मधील अमराई परिसरामध्ये गांजाची विक्री होत असल्याची गुप्त बातमी समजली. यानंतर त्यांनी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी एक महिला आढळून आली तिला ताब्यात घेण्यात आहे. तर दोघेजण फरार झाले आहेत. या नशेकरी आरोपींना पोलिस येत असल्याची भनक लागताच आरोपी दीपक प्रकाश सकट व सेवक प्रकाश सकट या दोघे फरार झाले तर आरोपी महिलेला पकडण्यात पालिसांना यश आले. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये एक कळशी व हंड्याच्या आतमध्ये ‛सव्वा तीन’ किलो गांजा ज्याची किंमत 1 लाख रुपये आहे तो आढळून आला. पोलिसांनी त्वरित या प्रकरणातील आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कलमाखाली बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, फौजदार संदिपान माळी, पोलीस नामदार ओंकार सिताप, पोलीस कॉन्स्टेबल राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, उमेश गायकवाड, अकबर शेख, कांबळे यांनी केली.