दौंडकरांना दिलासा : दौंड शहरातील 47 पैकी 47 निगेटिव्ह तर ग्रामीण भागातील या गावात एक पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड शहरवासीयांसाठी एक आनंदाची बातमी असून दौंड शहरातून 47 आणि ग्रामीण भागातून 1 असे पाठवण्यात आलेल्या 48 नमुन्यांपैकी 47 जणांचे नमुने हे निगेटिव्ह आले आहेत. तर वेतळनगर या ग्रामीण भागातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली. दौंड शहरामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणावर आपले प्रस्थ स्थापन केल्यानंतर वैद्यकीय टीमने याबाबत मोठी खबरदारी घेतली होती. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण हे आटोक्यात येण्यास मोठी मदत होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.