दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील कानगाव जवळ असणाऱ्या भीमानदी पात्रामध्ये एक तरुण बुडाल्याची माहिती समोर येत आहे.हा तरुण त्याच्या पत्नीसह मासेमारी करण्यासाठी नदीच्या डोहामध्ये गेल्याचे समजत आहे.
भारत भालेराव असे या 35 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मांडवगण फराटा ता.शिरूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. हा तरुण काल दुपारी मासेमारी करण्यासाठी नदीच्या पात्रामध्ये आपल्या पत्नीसह गेला होता.
मासेमारी करत असताना तो डोहात बुडाल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरडा सुरू केला. यानंतर ग्रामस्थ आणि पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला शोधायचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत मात्र अद्याप तो तरुण सापडला नाही. पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक घाडगे, पो.ह. पानसरे, मदने, यांसह सात ते आठ पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी तळ ठोकून आहेत.