थेऊरमध्ये 2 नवीन कोरोना रुग्ण, एॅक्टीव रुग्णाची संख्या 6



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी) 

थेऊर येथे गेल्या चार दिवसात सहा रुग्ण आढळून आल्याने हे गाव कंटेटमेंट (प्रतिबंधीत) झोन मध्ये समाविष्ट होऊ शकते कारण शासकीय नियमानुसार ज्या गावात पाच रुग्ण सापडतात ते गाव प्रतिबंधीत केले जाते.आजपर्यंत येथील एकुण रुग्णाचा आकडा 12 वर पोहोचला यापैकी सहा जण कोरानामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

 हवेली तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे यात उरुळी कांचन कुंजीरवाडी वाघोली मांजरी खुर्द लोणी काळभोर कदमवाकवस्ती अशा गावात दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत तर थेऊर मध्ये गेल्या चार दिवसात सहा रुग्ण आढळून आले यापैकी दोघांचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. हवेलीतील जवळपास वीस गावात कंटेटमेंट झोन जाहिर झाला आहे परंतु थेऊरचा यामध्ये समावेश नव्हता कारण येथे पाच कोरोना रुग्ण नव्हते पण आज सापडलेल्या दोन रुग्णामुळे या गावचा समावेश प्रतिबंधीत क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. सोमवारी मध्यरात्री पासून लाॅकडाऊन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे यात केवळ जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राचा समावेश होणार आहे असे महसूल विभागाकडून माहिती मिळाली आहे. 

कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी गावातील नागरिकांना काळजी घेण्याचे व कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.