केडगावमधील ‛त्या’ तरुणाची ‛कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह’ की निगेटिव्ह ? ‛या’ कारणामुळे होणार पुन्हा चाचणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील केडगाव येथे एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मात्र त्या रुग्णाची पुन्हा कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कारण ज्या लॅबमध्ये कोरोनाची टेस्ट घेण्यात आली होती ती प्रायव्हेट लॅब असून त्या लॅबमधील कोरोना रिपोर्ट या पुढे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. टेस्ट करणे आणि रिपोर्ट देण्याबाबत त्या प्रायव्हेट लॅबवर बंदी आणण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली आहे. त्यामुळे केडगाव येथे सापडलेला रुग्ण हा कोरोना बाधित आहे किंवा नाही हे आता सरकारी लॅबमध्ये कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतरच समजेल असे आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.