शहरातील पथ विक्रेत्यांना नगरपालिकेने आर्थिक सहाय्य करावे : MIM ची मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

संपूर्ण देश तसेच महाराष्ट्र राज्यात करोना महामारी उद्रेक झाल्याने सर्वत्र लॉक डाउन ची प्रक्रिया सुरू आहे त्याचा सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. विशेषतः शहरातील पथ विक्रेत्यांना तर आपले उपजीविकेचे साधनच पैशाअभावी गमवावे लागत आहे. अशा छोट्या व्यावसायिकांना नगरपालिकेने मदतीचा हात द्यावा अशी मागणी दौंड एम.आय. एम. पक्षाने दौंड  नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पथ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी केंद्रशासित पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी, विशेष सूक्ष्म- पतपुरवठा सुविधा योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे, ती अंमलबजावणी दौंड नगर पालिकेनेही करावी, त्याची अंमलबजावणी शहरात झाल्यास भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते,चहाचे अमृततुल्य, बेकरी,केश कर्तनालाय, पान दुकाने, चर्मकार आदी व्यवसाय करणाऱ्यांना त्याचा लाभ होईल. या  योजना राबविण्याबाबत केंद्र शासनाने सर्व राज्य शासनांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना या  योजनांचा लाभ  त्वरित  मिळावा अशी विनंती पक्षाने निवेदनातून केली आहे. निवेदन देते वेळी, पक्षाचे शहराध्यक्ष मतीन शेख, हमीद शेख, सतीश यादव, शाहिद पानसरे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.