व्हाट्सअपवर ‛मटका’, यवत पोलिसांचा दोघांना ‛झटका’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन  करण्यात आले. या लॉकडाउनमुळे अधिकृत धंदे बंद झाले मात्र अनधिकृत धंदे सुरू ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या आयडिया या दोन नंबरवाल्यांनी शोधून काढल्याचे दिसत आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी व्हाट्सअपवर मटका घेणाऱ्या एका महिलेला रंगेहात होते. तसाच प्रकार दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून पोलिसांनी 2 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 जुलै रोजी 12:30 वाजण्याच्या सुमारास खुटबाव ता.दौंड जि.पुणे. या गावच्या स्मशानभुमी जवळ आरोपी राजेंद्र यादव घोडके, (वय ४८ वर्षे रा.खुटबाव, इंदीरानगर ता.दौंड जि.पुणे) हा कल्याण नावाचा मटका खेळवत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. 

मटका क्वीन पुणे पोलिसांच्या जाळ्यात

यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी येथे छापा मारला असता त्या ठिकाणी वरील आरोपी  जुगाराची साधणे व 7,815 रुपयांची रोख रक्कम जवळ बाळगून कल्याण मटका नावाचा व खेळवीत असताना मिळुन आला. तसेच तो घेतलेला

मटक्याचा खेळ पुढे हेमंत काळभोर (रा. लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे) याचे मोबाईल फोनबरचे व्हाट्सअॅपला पाठवितो व त्याबद्दयाल्यात हेमंत काळभोर त्यास पैसे देतो अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल संपत खबाले यांनी आरोपी राजेंद्र यादव घोडके व हेमंत काळभोर यांच्या विरोधात फिर्याद दिली असून या दोघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.