दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या आज पुन्हा एकदा वाढली आहे. आज बाधित रुग्णांच्या संपर्कातील ७८ पैकी १३ जनांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.१४ते ७३ वर्ष वयोगटातील ७महिला व ६ पुरुष यांना करोना ची बाधा झाली आहे. गांधी चौक( दोन) स्टेट बँक परिसर (चार) सुतार नेट परिसर (एक) शालिमार चौक( दोन) नेहरू चौक( एक )सरपंच वस्ती (एक )गजानन सोसायटी परिसरातील एकाचा यामध्ये समावेश आहे.दि.१७ पर्यंत येथील उपजिल्हा रुग्णालयाने २०३५ संशयितांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी२१५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यापैकी १४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत,तर आज मितीला ५९रुग्ण येथील कोविड सेंटरला उपचार घेत असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली आहे.
शहरातील करोना महा मारीला ब्रेक लावण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय,दौंड नगरपालिका व पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने नगरपालिका व पोलीस प्रशासनाने ॲक्शन मोड घेतला असल्याचे दिसते आहे. शहरात लॉक डाऊन लागू केला असल्या ने फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त खुल्या दुकानांवर नगरपालिका दंडात्मक कारवाई करीत आहे, तसेच शहरात विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर तसेच शहरात विनाकारण दुचाकींवर डबल, ट्रिपल सीट फिरणाऱ्या कडून पोलीस दंड वसूल करीत आहेत. शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांची गस्त सुरू आहे, त्यामुळे दुपारी एक नंतर शहरातील वर्दळ कमी झाल्याचे दिसते आहे. प्रशासनाचे हेच प्रयत्न कामी येऊन शहरातील संसर्ग रोखला जाण्यास मदत होणार आहे. बाधितांची संख्या घटली तरच शहरातील लॉक डाउन उठेल,अन्यथा पुन्हा एकदा 14 दिवसांच्या लॉक डाउन ला दौंड करांना सामोरे जावे लागणार आहे .