दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगाव येथे कोरोना विषाणूने बाधित झालेले रुग्ण सापडत आहेत त्यामुळे केडगाव मधील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याबाबत दौंड, पुरंदर विभागाचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी आदेश काढले आहेत.
प्रांताधिकारी गायकवाड यांनी आपल्या या आदेशामध्ये संदर्भिय क्रमांक ६ अन्वये अहवाल प्राप्त झाल्याप्रमाणे दौंड तालुक्यातील केडगाव मधील पत्रा कंपनी येथे ५ कोरोना व्हायरस संक्रमीत रूग्ण आढळले आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रसाराचे काम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होते.
त्यासाठी त्या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून व सदर रूग्णाने उपरोक्त नमूद भागामध्ये प्रवास केलेला असल्याने केडगाव मधील पत्रा कंपनी येथील नवले लॉन्स (पुर्व) , शेती क्षेत्र (पश्चिम), पुणे – सोलापूर हायवे (दक्षिण) व कॅनॉल (उत्तर) या दरम्याचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र (containment zone) म्हणून मी घोषीत करीत आहे असे त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
तसेच या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कुणास सूट आणि कुणाला प्रतिबंध असेल याची नियमावली खालील प्रमाणे आहे.
१. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी, पालिस
विभागाचे, राज्य व केंद्र विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने, वैद्यकिय सेवा व अत्यावश्यक सेवा देणान्या कर्मचारी व वाहने वगळता अन्य व्यक्ती यांना संबंधित प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) मध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी असेल.
२. सदर काळात सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या कालावधीतच दूध,भाजीपाला,फळे विक्री सुरू राहील. यासाठी गटविकास अधिकारी दौंड यांचे मार्गदर्शनाखालील स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांचे स्तरावर स्थानिक परिस्थितीनूसार योग्य ते नियोजन करावे. सदर विक्री करणेसाठी गट विकास अधिकारी दौंड यांनी विशेष आदेश
काढून जागा निश्चित करून द्यावी. गट विकास अधिकारी दौड यांनी निश्चित केलेल्या जागेवरच विक्री करण्यात अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.