दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरामध्ये सध्या कोरोना व्हायरसणे आपला डेरा जमवला आहे. दौंड शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनामुळे दौंड शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे.
काल पुन्हा 26 जणांचे स्वॅब नमुने पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 4 जण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या 26 त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून दौंड शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 11 आहे.
याबाबत विस्तृत माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. येथील बंगला साईड, सरपंच वस्ती, समता नगर, शिवराज नगर या परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. दि.६ जुलै पासून शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आज रविवार, लॉक डाऊन चा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून शहरात लॉक डाऊन राहणार की उठणार याचा आज प्रशासन निर्णय घेणार आहे, प्रशासनाच्या निर्णयाची दौंड करांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
दौंड शहरामध्ये कोरोना आटोक्यात येण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे मात्र नागरिकांची गर्दी आणि नागरिकांकडून नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे कोरोना आटोक्यात येण्यास मोठी अडचण येत आहे.