दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाची स्थिती बिकट बनत चालली आहे. एखादया दुसऱ्या गावात सापडणारे कोरोना रुग्ण आता गावागावात सापडू लागले आहेत.
आज बुधवार दि. 22 जुलै रोजी दौंड ग्रामीण भागाध्ये 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली.
सापडलेले रुग्ण हे देलवडी 1, पडवी 1, भांडगाव 1 आणि पाटस 2 या गावांतील असून देलवडी येथे प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने त्या गावातील नागरिक चिंताक्रांत अवस्थेत दिसत आहेत.
57 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती त्यामध्ये हे 5 जण कोरोना पिझिटिव्ह आढळले आहेत.
कोरोना व्हायरस आता ग्रामीण भागात घेरत चालला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यास याचा आणखीन फैलाव होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.