पुणे : सहकारनामा ऑनलाईन
पुणे शहर आणि परिसरामध्ये विभागांमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच असल्याने शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आधीचेच नियम आहे तसेच राहतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे. मात्र येणारे पुढचे शनिवार आणि रविवारी या दोन दिवसात कडक लॉकडाऊन ठेवा, या व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.
पुण्यामध्ये पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत गुरूवारी रात्री 12 वाजता संपत आहे. मात्र, मुदत संपण्याच्या काही तास अगोदरच शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत अगोदरचे आहे ते नियम राहतील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने प्रशासनाने 13 जुलै पासून कडक लॉकडाउन अंमलात आणला होता. हा लॉकडाउन आज रात्री संपणार आहे.