पुणे : सहकारनामा ऑनलाईन
दिनांक १६/७/२०२० रोजी पहाटे ०४.०० वा च्या सुमारास येरवडा कारागृह, पहिला मजला, इमारत क्रमांक ४ येथून खोली क्रमांक ५ मधील खिड़कीचे गज उचकटून तोडून टाकून खुनासह दरोडा मोक्का गुन्हयातील ३, खंडणी मोक्का गुन्हयातील १ व घरफोडी गुन्हयातील १ असे एकूण ५ आरोपी पळून गेले होते.
सदर आरोपींचा शोध घेणे कामी मा.पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आलेले होते. जेलमधून पळालेले आरोपींपैकी दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. १४९/२०२० भा.दं.वि.क.३९५, ३९६, ३९७ (सह मोक्का) या गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी नामे देवगण अजिनाथ चव्हाण (वय २५ वर्षे रा.बोरावकेनगर ता.दौंड जि.पुणे) हा राक्षसवाडी रोड ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथे येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने श्रीगोंदा पोलीस स्टेशनची मदत घेवून वेशांतर करून त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीस पाठलाग करून ताब्यात घेतलेले आहे.
सदर आरोपी याचेवर दौंड व यवत पोलीस स्टेशनला खुनासह दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात येत आहे.
सदर कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पोलीस नाईक गुरु गायकवाड, सुभाष राऊत व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोहवा.अंकुश ढवळे यांनी केलेली आहे.