coronavirus : केडगाव आणि सोनवडी मध्ये पुन्हा 5 जणांना कोरोनाची बाधा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव आणि सोनवडी या दोन गावांमध्ये एकूण 5 जण कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत, याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली.

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचे थैमान सुरूच असून येथे कुठे न कुठे कोरोनाचे रुग्ण सापडतच आहेत. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता दौंड तालुक्याला कोरोनाने आपले माहेघर केले आहे की काय अशी शंका येत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आता नागरिकांनी जास्त सतर्क होण्याची वेळ आली आहे, अन्यथा याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील यात शंका नाही.