पुणे : सहकारनामा ऑनलाईन
पुण्यातील वडगाव शेरी (नगररोड) भागातील रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार
पडली. यावेळी स्थानिक प्रशासनानं आमदारांशी समन्वय साधून विकासकामं पूर्ण करावीत. विकासकामांच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2499 भरला.
पुढे बोलताना त्यांनी कोरोनाचा सामना करताना विकासकामांना गती द्यावी, सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामं गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसंच शासन स्तरावरील कामं तत्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली.
खराडी ते शिवणे नदीकाठच्या रस्त्यासह नगररोडवरील रस्त्यांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेतला. सार्वजनिक हित लक्षात घेऊन रस्त्यांची कामं वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. नगररोड भागातील उड्डाण पुलाच्या कामाबाबत स्थानिक आमदार, महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन तो विषय मार्गी लावण्याचं सूचित केलं.
रस्त्यांच्या कामाच्या अनुषंगानं प्रशासन स्तरावरील प्रश्न स्थानिक आमदार, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयानं सोडवावेत. वनविभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागांच्या मंजुरीसाठीचे प्रस्ताव शासनाला तातडीनं सादर करावेत. त्यामुळे शासन स्तरावरील कामं लवकरच मार्गी लावता येतील. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महापालिकेचे संबंधित विभाग, वन विभाग व अन्य संबंधित विभागांनी समन्वय साधून, पाठपुरावा ठेऊन रस्त्यांची विकास विकासकामं गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.