दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड शहराला कोरोनाचे लागलेले ग्रहण सुटत नसल्याचे दिसत आहे.
उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 27जुलै रोजी एकुण 73 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट आज 28 जुलै रोजी प्राप्त झाले असून 73 जणांपैकी एकूण 12 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर 60 जण निगेटिव्ह आले असून 1 रिपोर्ट येणे बाकी आहे.
याबाबत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी माहिती दिली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह अलेल्यांमध्ये
महिला- 5, पुरूष -7, दौंड शहर -11, ग्रामीण–1, अशी संख्या असून यामध्ये समतानगर-2, पाटील चौक-2, बंगला साईड-2, नेहरू चौक-1, शालीमार चौक-1, सहयोग सोसायटी-1, जनता कॉलनी-1, जगदाळे वस्ती-1, या सर्वांचा वयोगट 14 ते 82 वर्ष असा आहे.