दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड शहरामध्ये कोरोनापासून एक दिवस दिलासा मिळतो न मिळतो तोच दुसऱ्या दिवशी पुन्हा कोरोना आपले रंग दाखवत असल्याचा अनुभव दौंडकरांना येत आहे.
काल दौंड शहरवासीयांना दिलासादायक वातावरण लाभले असताना आज पुन्हा कोरोनाने त्यांच्या चिंतेत भर टाकली आहे.
आज दौंड शहरामध्ये पुन्हा 9 जण कोरोना बाधित झाले असून उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 29 जुलै रोजी एकुण 30 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी आज 9 व्यक्ती या पॉझिटिव्ह आल्या आहेत. याबाबत ची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. एकूण 21 जणांचे नमुने प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. या 9 जणांमध्ये 3 महिला तर 6 पुरुषांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती या पाटील चौक-1, बंगला साईड-1, नेहरू चौक-1, शालीमार चौक-1, गजानन सोसायटी-1, जनता कॉलनी-1, जगदाळे वस्ती-1, गोपाळवाडी- 1, भवानी नगर- 1 या प्रभागातील असून हे सर्व 18 ते 75 या वयोगटातील आहेत.