Corona Update : दौंड शहरामध्ये पुन्हा ‛चौघांना’ कोरोनाची बाधा, या ‛तीन’ ठिकाणांचा समावेश



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दि.३० जुलै रोजी बाधित रुग्णांच्या संपर्कातील २२  जणांचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात  आले होते, त्यापैकी १८ जनांचा अहवाल निगेटिव आला असून ४ जनांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.२पुरुष,२महिलांचा यामध्ये समावेश आहे. बंगला साईड(१), स्वामी समर्थ मंदिर(१) तसेच शालिमार चौक(२) येथील रुग्णांना कोरोना ची लागण झाली आहे अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.

दौंड शहरात कोरोना कभी खुशी कभी गम असा अनुभव देत आहे. तपासणी झालेल्या पैकी निगेटिव अहवाल येण्याची संख्या  सध्या जास्त येत आहे, आणि ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत त्यापैकी बहुतांशी रुग्णांमध्ये अगदी सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. आणि अशा रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाच्या  कोविड सेंटर्समध्ये योग्य व वेळेत उपचार मिळत असल्याने शहरातील बरे होऊन घरी परतणाऱ्या  रुग्णांच्या  संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे  बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी घाबरून न जाता वेळेतच आपली तपासणी करून घ्यावी,  तरच त्यांना वेळेवर उपचार देऊन कोरोना मुक्त करण्यात प्रशासनाला यश येईल व शहरात  कोरोना चा संसर्ग रोखण्यास प्रशासनाला मदत होईल असे  आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी केले आहे.