पुणे : सहकारनामा ऑनलाईन
चिनवरून प्रवास करून पुणे जिल्ह्यात आलेल्या कोरोना व्हायरसने आता पुणे जिल्ह्यातही चांगलेच थैमान घातले आहे. हा कोरोना व्हायरस पुणे जिल्ह्यामध्ये आपला इतका जम बसवेल असे कुणालाही वाटत नव्हते मात्र त्याचा वाढत असलेला वेग पाहता याला रोखावे कसे हाच मोठा प्रश्न सध्या सर्वांसमोर उभा आहे.
विविध उपाय करूनही कोरोना आता थेट कंपन्यांना लक्ष करू लागला आहे. आज चाकण येथील MIDC मध्ये असणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीत काम करणाऱ्या तब्बल 120 कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने MIDC परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हा भयानक प्रकार समोर आल्यानंतर तातडीने हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशाकीय यंत्रणा कामाला लागली असून आज गट विकास आधिकारी अजय जोशी आणि तालुका आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
चाकणच्या या प्रसिद्ध कंपनीत इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित कामगार सापडल्याने या कामगारांच्या संपर्कात आलेले येथील अनेक कामगार चिंतेत वावरताना दिसत आहेत.
कोरोना बाधित कामगार हे खेड तालुका आणि पिंपरी चिंचवड परिसरातील असल्याची माहितीही समोर येत आहे.