दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरात कोरोना चा प्रभाव कधी कमी तर कधी एकदम वाढलेला दिसतो, परंतु आज मात्र कोरोना ने दौंड करांना दिलासा दिला आहे.५९ पैकी फक्त तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या एकूण ५९ जणांचे स्त्राव दि.३ ऑगस्ट रोजी तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते, आज रोजी त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालानुसार ६०-६७ वयोगटातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शालिमार चौक,गांधी चौक परिसर व ग्रामीण भागातील एकाचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली आहे.