दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. आज दि. 06 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार सुमारे 69 जणांचे घशातील द्रव नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 7 गावांतील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरवाडकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.
कोरोना बाधित झालेल्या 8 रुग्णांमध्ये देलवडी 1, एकेरीवाडी 1, पारगाव 2, कानगाव 1, खडकी 1, वासुंदे 1, कुरकुंभ 2 अशी गावनिहाय आकडेवारी असून कोरोनाबाबत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.