दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
कोरोना महामारी चा संसर्ग शहरात पसरू नये म्हणून येथील प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहे, त्यामुळे संसर्गावर नियंत्रण मिळत असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाने बाधितांच्या संपर्कातील ५६ संशयितांचे स्त्राव दि.६ रोजी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते, आज त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.
५६ पैकी फक्त दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ५४ जणांना दिलासा आहे. शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या एकाला करोनाची बाधा झाली आहे तर दुसरा बाधित रुग्ण गोपाळवाडी परिसरातील असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.