दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
शहरातील बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे चित्र सध्या दौंडमध्ये दिसत असून उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या उपाय योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हे प्रतीक आहे.दि.७ ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयाने येथील २९ संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते, त्यापैकी फक्त २ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी प्रयत्नशील प्रशासनाला अशीच मदत केली तर दौंड मधून कोरोना लवकरच हद्दपार होईल यात शंका नाही.
अहवालानुसार ३०-७८वयोगटातील एक पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, शहरातील शिवाजी चौक व सरस्वती नगर या परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.