अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भावाचे निधन (Donald Trump’s brother dies)



न्यूयॉर्क : 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा वयाने लहान असणारे त्यांचे 71 वर्षीय बंधू रॉबर्ट ट्रम्प यांचे 15 ऑगस्टच्या रात्री उशिरा निधन झाले. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

याबाबत त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये माहिती देताना ‘मी खूपच दुःखी अंतःकरणाने सांगू इच्छितो की माझा लहान भाऊ रॉबर्ट याचे शनिवारी रात्री उशिरा दुःखद असे निधन झाले आहे. तो नुसता माझा भाऊ नव्हता तर माझा एक अतिशय चांगला मित्र होता. त्याच्या मृत्यूमुळे मला खूपच दुःख होत असून त्याची उणीव माझ्या जीवनात भरून निघणे शक्य नाही.  परमेश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ट्रम्प यांनी माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान होता. माझ्यात आणि त्याच्यात भावापेक्षा मैत्रीचे नाते जास्त घट्ट होते, असेही ट्रम्प यांनी शेवटी विधान केले आहे.