वाल्हे : सहकारनामा ऑनलाईन (सिकंदर नदाफ)
दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असताना जलसंधारणाची जलसमृद्धी हिच शेतकऱ्यांना समृद्ध करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील ओसंडून वाहणाऱ्या बापसाई धरण-बंधाऱ्याचे जलपूजन करताना प्रा.दुर्गाडे हे बोलत होते.या प्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष समदास भुजबळ राष्ट्रवादी युवक काँगेसचे सरचिटणीस दादासाहेब मदने यांसह माजी सरपंच दत्तात्रेय पवार महादेव चव्हाण उपसरपंच सुर्यकांत भुजबळ विध्यार्थी संघटनेचे संदेश पवार तसेच तुषार भुजबळ सुनील पवार दादा म्हेत्रे बजरंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत आनंदोत्सव देखील साजरा केला.
प्रा.दुर्गाडे पुढे म्हणाले गेल्या दोन ते तीन वर्षापासून या भागाला निसर्गाची साथ चांगल्याप्रकारे मिळाल्याने जलसंधारणाच्या कामांचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे .तर शेतकऱ्यांनी देखील एकसारखी पिके न घेता वेगवेगळ्या पिकांची लागवड करून किफायतशीर शेती करणे तितकेच गरजेचे आहे. यावेळी उपस्थितांचे आभार दिपक कुमठेकर यांनी मानले.