धक्कादायक : दौंड शहराच्या उपजिल्हा रुग्णालयातील 3 “व्हेंटिलेटर आणि सर्व ऑक्सिजन बेड फुल”, नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे डॉ.संग्राम डांगे यांचे आवाहन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड शहरामध्ये असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील सर्व 3 व्हेंटिलेटर सध्या व्यस्त असून सर्व तेथे असणारे सर्व ऑक्सिजेन बेडही फुल झालेले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यास मोठे संकट ओढवू शकते.

याबाबत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.संग्राम डांगे यांनी माहिती देताना दौंड शहरात असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील जवळजवळ सर्वच ऑक्सिजन बेड आणि तिन्ही व्हेंटिलेतर हे रुग्णांमुळे फुल झालेले आहेत त्यामुळे नवीन येणाऱ्या रुग्णांसाठी येथे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे आता शक्य नाही त्यामुळे नागरिकांनी अधिक जागरूक होऊन स्वतःला कोरोनापासून वाचवणे गरजेचे आहे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी केले आहे.

यावर आता उपाय म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावे,  सोशल डिस्टन्स ठेऊन आपले संभाषण आणि व्यवहार पहावे तसेच सॅनिटायजरचा वापर करत रहावा असे आवाहन केले आहे.

सोमवार पासून दौंडकरांसाठी रॅपिड अँटीजेन चाचणी सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. त्यामुळे अवघ्या अर्ध्यातासात या आजाराचे निदान होऊन रुग्णांवर लवकर उपचार सुरू करता येणार आहेत.