केडगाव गावठाणाच्या मारुती मंदिरामागेच तळीरामांनी केला अड्डा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण हे ऐतिहासिक जुने गाव म्हणून ओळखले जाते. या गावठाणात जुने ऐतिहासिक वाडे, बळदी, आड, विहिरी आणि पुरातन मंदिरे आढळून येतात. मात्र आता या ऐतिहासिक अशा गावठाणाला एका वेगळ्याच समस्येने ग्रासले  आहे. येथील जुन्या मारुती मंदिरामागे दररोज तळीरामांचा अड्डा जमत असून हे तळीराम फुग्यातून दारू आणून या ठिकाणी मनसोक्त ढोसून ते फुगे मंदिराच्या मागेच फेकून देत असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. हा प्रकार येथील सामाजिक करकर्त्या महिलांनी अनेकवेळा गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला मात्र त्याचा अजूनही काहीच परिणाम झालेला दिसत नाही.

मंदिरात दर्शनाला येणारे भाविक, भक्त आणि महिलांना या तळीरामांचा आणि त्यांच्या दारूच्या फुग्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत त्यामुळे आता पोलीस प्रशासनानेच याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्या शर्मा यांनी ‛सहकारनामा’च्या माध्यमातून केली आहे.